मे १०
Wikipedia कडून
मे १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३० वा किंवा लीप वर्षात १३१ वा दिवस असतो.
<< | मे २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ||||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ||
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | ||
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | ||
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ | ||
चैत्र/वैशाख शके १९३० |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] तेरावे शतक
- १२९१ - स्कॉटिश सरदारांनी इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला याचे वर्चस्व स्वीकारले.
[संपादन] सोळावे शतक
- १५०३ - क्रिस्टोफर कोलंबसने केमन द्वीपसमूहाला भेट दिली व त्यांचे नामकरण ला तोर्तुगा असे केले.
- १५३४ - जॉक कार्टियेने न्यू फाउंडलंड भेट दिली.
[संपादन] अठरावे शतक
- १७६८ - न्यू ब्रिटोन या नियतकालिकात राजा जॉर्ज तिसर्यावर टीका करणारा लेख लिहिल्याबद्दल जॉन विल्किसला तुरुंगात टाकण्यात आले. लंडनमध्ये दंगे.
- १७७४ - लुई सोळावा फ्रांसच्या राजेपदी.
- १७७५ - अमेरिकन क्रांति - कर्नल बेनेडिक्ट आर्नोल्ड व इथन ऍलेनच्या सैन्याने फोर्ट टिकॉन्डेरोगा हा किल्ला जिंकला.
- १७७५ - अमेरिकन क्रांति - अमेरिकेच्या १३ वसाहतींच्या प्रतिनिधींनी खंडीय सैन्याची उभारणी केली व त्याचे नेतृत्त्व व्हर्जिनीयाच्या कॅव्हेलियर जॉर्ज वॉशिंग्टनकडे दिले.
- १७९६ - नेपोलियन बोनापार्टने इटलीत ऑस्ट्रियाच्या सैन्याचा पराभव केला.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०१ - ट्रिपोलीच्या बार्बेरी चाच्यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८५७ - पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम सुरू.
- १८६५ - अमेरिकन गृहयुद्ध - उत्तरेच्या सैन्याने दक्षिणेच्या राष्ट्राध्यक्ष जेफरसन डेव्हिसला पकडले.
- १८६९ - अमेरिकेचे दोन्ही किनारे रेल्वेने जोडले गेले. युटाहमधील प्रोमोन्टरी पॉईंट येथे पूर्व आणि पश्चिमेकडून बांधत आलेले लोहमार्ग जोडले गेले.
- १८७७ - रोमेनियाने स्वतःला तुर्कस्तानपासून स्वतंत्र जाहीर केले.
[संपादन] विसावे शतक
- १९२२ - अमेरिकेने किंगमन रीफ हा द्वीपसमूह बळकावला.
- १९२४ - जे. एडगर हूवर अमेरिकेच्या एफ.बी.आय.च्या निदेशकपदी. हूवर १९७२ पर्यंत या पदावर होता.
- १९३३ - जर्मनीत नाझींनी पुस्तकांची जाहीर होळी केली.
- १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मनीने इंग्लंडच्या पेलहाम गावावर बॉम्बफेक केली.
- १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मनीने बेल्जियम, नेदरलँड्स व लक्झेम्बर्गवर आक्रमण केले.
- १९४० - दुसरे महायुद्ध - नेव्हिल चेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - लुफ्तवाफेच्या बॉम्बफेकीत इंग्लंडचे हाउस ऑफ कॉमन्स नष्ट.
- १९६० - अमेरिकेच्या परमाणुचलित पाणबुडी यु.एस.एस. ट्रायटनने पाण्याखालून पृथ्वीप्रदक्षिणा केली.
- १९६९ - व्हियेतनाम युद्ध - हॅम्बर्गर हिलची लढाई.
- १९७९ - मायक्रोनेशिया प्रजासत्ताक झाले.
- १९८१ - फ्रांस्वा मित्तरां फ्रांसचा राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९३ - थायलंडमध्ये खेळण्यांच्या कारखान्यास आग. १८८ ठार.
- १९९६ - एव्हरेस्टवर हिमवादळ. चढाई करणारे ८ व्यक्ति ठार.
- १९९७ - ईशान्य इराणमध्ये भूकंप. २,४०० ठार.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १२६५ - फुशिमि, जपानी सम्राट.
- १८३८ - जॉन विल्क्स बूथ, अब्राहम लिंकनचा मारेकरी.
- १८७८ - गुस्ताव स्ट्रेसमान, जर्मनीचा चान्सेलर.
- १८९७ - आयनार गेर्हार्डसन, नॉर्वेचा पंतप्रधान.
- १९२७ - नयनतारा सहगल भारतीय लेखिका.
- १९५५ - मार्क चॅपमन, जॉन लेननचा मारेकरी.
- १९५८ - तौसीफ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६० - बोनो, आयरिश गायक.
[संपादन] मृत्यू
- १०३४ - मियेस्झ्को दुसरा, पोलंडचा राजा.
- १४२४ - गो-कामेयामा, जपानी सम्राट.
- १४८२ - पाओलो डाल पोझो टोस्कानेली, इटलीचा गणितज्ञ व अंतराळतज्ञ.
- १७३७ - नाकामिकाडो, जपानी सम्राट.
- १७७४ - लुई पंधरावा, फ्रांसचा राजा.
- १८६३ - स्टोनवॉल जॅक्सन, अमेरिकन गृहयुद्धातील दक्षिणेचा सेनापती.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- संविधान दिन - मायक्रोनेशिया.
- पालक दिन - दक्षिण कोरिया.
- मातृ दिन - मेक्सिको.