डिसेंबर १६
Wikipedia कडून
<< | डिसेंबर २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | |||
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | ||
१४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | ||
२१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | ||
२८ | २९ | ३० | ३१ | |||||
२००८ |
डिसेंबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५० वा किंवा लीप वर्षात ३५१ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] चौदावे शतक
- १३९२ - जपानी सम्राट गो-कामेयामाने पदत्याग केला. गो-कोमात्सु सम्राटपदी.
[संपादन] सतरावे शतक
- १६३९ - इंग्लंडच्या संसदेने नागरी हक्कनामा प्रस्तुत केला.
[संपादन] अठरावे शतक
- १७७३ - अमेरिकन क्रांति-बॉस्टन टी पार्टी - टी ऍक्टच्या विरोधात सन्स ऑफ लिबर्टीच्या सदस्यांनी मॉहॉक वेश धारण करून बॉस्टनच्या बंदरात चहाची खोकी फेकली.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८३८ - ब्लड रिव्हरची लढाई - दक्षिण आफ्रिकेत क्वाझुलु, नाताल येथे ऍंड्रीझ प्रिटोरियसच्या नेतृत्त्वाखाली फूरट्रेक्कर आणि दाम्बुझा(न्झोबो) व न्देला कासोम्पिसी या झुलु ईम्पी सरदारांच्या सैन्यात घनघोर युद्ध. झुलुंच्या भाले आणि बाणांविरूद्ध बोअर बंदुका. तीन फूरट्रेक्कर जखमी ३,००० झुलु ठार.
- १८६४ - अमेरिकन गृहयुद्ध - मेजर जनरल जॉर्ज एच. थॉमसच्या युनियन सैन्याने लेफ्टनंट जनरल जॉन बेल हूडच्या कॉन्फेडरेट आर्मी ऑफ टेनेसीला हरविले.
[संपादन] विसावे शतक
- १९२२ - वॉर्सोमध्ये पोलंडचा अध्यक्ष गेब्रियेल नारुतोविझचा खून.
- १९४२ - ज्यूंचे शिरकाण - हाईनरिक हिमलरने रोमा(जिप्सी) लोकांना कत्तलीसाठी ऑश्विझला पाठविले.
- १९४४ - दुसरे महायुद्ध-बॅटल ऑफ द बल्ज - बेल्जियमच्या आर्देनेस प्रदेशात जनरल ड्वाइट डी. आयझेनहोवर आणि फील्ड मार्शल गेर्ड फोन रूंड्स्टेटच्या सैन्यात लढाई.
- १९४६ - लेओन ब्लुम फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९५७ - ई.ई.चुंदरीगरने राजीनामा दिल्यावर सर फिरोजखान नून पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
- १९६० - हिमवादळात न्यूयॉर्कच्या आयडलवाइल्ड विमानतळाजवळ युनायटेड एरलाईन्सचे डग्लस डी.सी.८ आणि ट्रान्स वर्ल्ड एरलाईन्सच्या सुपर कॉन्स्टेलेशन जातीच्या विमानांमध्ये स्टेटन आयलंडवर हवेत टक्कर. १३४ ठार.
- १९७१ - बांगलादेश मुक्ति युद्ध - बांगलादेश विजय दिन. पाकिस्तानी फौजेने मित्रो बाहिनी समोर सपशेल शरणागति पत्करली.
- १९८९ - रोमेनियातील क्रांति - हंगेरीच्या पास्टर लास्लो तोकेसला देशनिकाल देण्याविरूद्ध तिमिसोआरा मध्ये नागरिकांनी सरकारचा निषेध केला.
- १९९८ - ऑपरेशन डेझर्ट फॉक्स - अमेरिका व युनायटेड किंग्डमने ईराकवर बॉंबफेक केली.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १४८५ - अरागॉनची कॅथेरीन, इंग्लंडची राणी.
- १७७० - लुडविग वान बीथोवेन, जर्मन संगीतज्ञ.
- १७७५ - जेन ऑस्टेन, ब्रिटीश लेखक.
- १७९० - लिओपोल्ड पहिला, बेल्जियमचा राजा.
- १८८२ - सर जॅक हॉब्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८८ - अलेक्झांडर, युगोस्लाव्हियाचा राजा.
- १९१७ - सर आर्थर सी. क्लार्क, ब्रिटीश लेखक.
- १९५२ - जोएल गार्नर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १५१५ - आल्फोन्सो दी आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत.
- १९२२ - गेब्रियेल नारुतोविझ, पोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- बहरैन - राष्ट्रीय दिन.
- बांगलादेश - विजय दिन.
- कझाकस्तान - स्वातंत्र्य दिन.
- दक्षिण आफ्रिका - सामंजस्य दिन (पूर्वीचा शपथ दिन).
डिसेंबर १४ - डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - (डिसेंबर महिना)