जानेवारी १८
Wikipedia कडून
<< | जानेवारी २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ||||
६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | ||
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | ||
२० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | ||
२७ | २८ | २९ | ३० | ३१ | ||||
मार्गशीर्ष/पौष शके १९२९ |
जानेवारी १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८ वा किंवा लीप वर्षात १८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] चौथे शतक
- ३३६ - संत मार्क पोपपदी.
- ३५० - रोमन सेनापती मॅग्नॅन्टीयसने सम्राट कॉन्स्टान्सला पदच्युत केले व स्वतःला रोमन सम्राट घोषित केले.
[संपादन] सोळावे शतक
- १५३५ - फ्रांसिस्को पिझारोने पेरूची राजधानी लिमाची स्थापना केली.
[संपादन] सतरावे शतक
[संपादन] अठरावे शतक
- १७०१ - फ्रेडरिक पहिला प्रशियाच्या राजेपदी.
- १७७८ - कॅप्टन जेम्स कूक हवाईला पोचणारा पहिला युरोपियन ठरला. त्याने या द्वीपसमूहाचे नाव सॅन्डविच आयलंड्स असे ठेवले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - जॉर्जिया अमेरिकेपासून विभक्त झाले.
- १८७१ - विल्हेम पहिला जर्मनीचा पहिला कैसर(सम्राट) झाला.
- १८८६ - इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना. हॉकीच्या खेळाला प्रथमतः मान्यता.
[संपादन] विसावे शतक
- १९११ - युजीन बी. इलायने सान फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु.एस.एस.पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग.
- १९१२ - इंग्लिश शोधक रॉबर्ट एफ. स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोचला. त्याच्या दुर्दैवाने रोआल्ड अमुंडसेन त्याआधी महिनाभर तेथे पोचला होता. स्कॉट व त्याचे सहकारी परतताना मृत्यू पावले.
- १९१९ - पहिले महायुद्ध - व्हर्साय येथे पहिली शांति परिषद सुरू झाली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने लेनिनग्राडला घातलेला वेढा रशियाने फोडला.
- १९५६ - संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच कॉंग्रेस आमदारांचा राजीनामा
- १९६४ - न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींचे भूमिपूजन.
- १९६९ - युनायटेड एरलाईन्स फ्लाईट २६६ हे बोईंग ७२७ जातीचे विमान सांता मॉनिका बेमध्ये कोसळले. ३८ ठार.
- १९७७ - सिडनीजवळ ग्रॅनव्हिल स्थानकात रेल्वे घसरली. ८३ ठार.
- १९९७ - नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- ८८५ - डैगो, जपानी सम्राट.
- १८४२ - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, अर्थशास्त्रज्ञ,समाजसुधारक,राजनीतीज्ञ.
- १८४९ - एडमंड बार्टन, ऑस्ट्रेलियाचा पहिला पंतप्रधान.
- १८५४ - थॉमस वॅट्सन, अलेक्झांडर ग्रॅहाम बेलचा मदतनीस, पहिल्या दूरध्वनी संभाषणातील भागीदार.
- १८९२ - ऑलिव्हर हार्डी, अमेरिकन अभिनेता. लॉरेल आणि हार्डी या जोडीतील अर्धा भाग.
- १८९४ - लेस्ली वॉलकॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १८८८ - थॉमस सॉपविथ, ब्रिटीश विमान उद्योजक.
- १८८९ - नाट्यछटाकार दिवाकर लेखक.
- १८९५ - विठठ्ल दत्तात्रय घाटे प्रसिद्ध लेखक
- १९०४ - कॅरी ग्राँट, ईंग्लिश अभिनेता.
- १९१६ - अलेक कॉक्सॉन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३१ - चुन दू-ह्वान, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३३ - रे डॉल्बी, अमेरिकन संशोधक.
- १९४४ - पॉल कीटिंग, ऑस्ट्रेलियाचा २४वा पंतप्रधान.
- १९७२ - विनोद कांबळी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ३५० - कॉन्स्टान्स, रोमन सम्राट.
- ४७४ - लिओ पहिला, बायझेन्टाईन सम्राट.
- १३६७ - पेद्रो पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १४७१ - गो-हानाझोनो, जपानी सम्राट.
- १८६२ - जॉन टायलर, अमेरिकेचा १०वा अध्यक्ष.
- १९२७ - कार्लोटा, मेक्सिकोची सम्राज्ञी.
- १९३६ - रूड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. रावबहाद्दुर काळे, अर्थशास्त्रज्ञ व नेमस्त पुढारी.
- १९४७ - कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक.
- १९६७ - डॉ.पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक.
- १९७१ - बॅरिस्टर नाथ पै, भारतीय वकील, संसदसदस्य.
- १९८६ - प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक
- २००३ - हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
जानेवारी १६ - जानेवारी १७ - जानेवारी १८ - जानेवारी १९ - जानेवारी २० - (जानेवारी महिना)