स्पेन
Wikipedia कडून
स्पेन | ||||||
Reino de España
(रेइनो दे एस्पान्या ) स्पेनचे राजतंत्र |
||||||
|
||||||
![]() |
||||||
जागतिक नकाशावरील स्थान | ||||||
![]() |
||||||
नकाशा | ||||||
ब्रीदवाक्य | Plus Ultra अजुनी पुढे | |||||
राजधानी | माद्रिद | |||||
सर्वात मोठे शहर | माद्रिद | |||||
राष्ट्रप्रमुख | हुआन कार्लोस पहिला(राजा) | |||||
पंतप्रधान | होजे लुइस रोद्रिगेझ झापातेरो | |||||
राष्ट्रगीत | मार्चा रेआल (शाही कूच) (Marcha Real)(फक्त संगीत, शब्द नाहीत) | |||||
राष्ट्रीय भाषा | स्पॅनिश | |||||
इतर प्रमुख भाषा | गॅलिशियन, बास्क, कॅटालान, वालेन्सियन | |||||
राष्ट्रीय चलन | युरो(१९९९ पासून) स्पॅनिश पेसेटा(१९९९ पर्यंत) |
|||||
क्षेत्रफळ एकूण– पाणी– |
५०वा क्रमांक ५,०४,७८२ किमी² |
|||||
लोकसंख्या एकूण– घनता– |
२९वा क्रमांक ४,४३,९५,२८६ (२००५चा अंदाज) ८७.८ प्रती किमी² |
|||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | CET (यूटीसी +१) | |||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +३४ | |||||
आंतरजाल प्रत्यय | .es | |||||
वार्षिक सकल उत्पन्न (GDP) |
१२वा क्रमांक १,०८९ अब्ज अमेरिकन डॉलर किंवा युरो(१९९९ पासून) स्पॅनिश पेसेटा(१९९९ पर्यंत) |
|||||
वार्षिक दरडोई उत्पन्न (GDP per capita) |
२५वा क्रमांक २६, ३२० अमेरिकन डॉलर किंवा युरो(१९९९ पासून) स्पॅनिश पेसेटा(१९९९ पर्यंत) |
स्पेन (स्पॅनिश:(España)एस्पान्या) (IPA|es'paɲa), अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र (स्पॅनिश:रेइनो दे एस्पान्या) हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला देश आहे. स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्स व आंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्को व जिब्राल्टर यांना लागून आहेत. फ्रान्सनंतर स्पेन हा पश्चिम युरोपमधला दुसरा मोठा व इबेरियन द्वीपकल्पातील तीन देशांपैकी सर्वात मोठा देश आहे.
स्पेनमध्ये अध्यक्षीय लोकशाही असून हा देश युरोपीय महासंघाचा १९८६ पासून सभासद आहे. हा देश विकसित असून स्पॅनिश अर्थव्यवस्था जगात नवव्या आणि युरोपीय महासंघात पाचव्या क्रमांकावर आहे.
![]() |
स्पेन हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
हा/हे लेख किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला जात आहे. तरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करुन मदत करू शकता. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. जर हे पान संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाका. |
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
मुख्य लेख: स्पेनचा इतिहास
स्पेनचा इतिहास खूप प्राचीन आहे. रोमन साम्राज्यात स्पेनची भरभराट झाली आणि हा देश रोमन साम्राज्यातील महत्वाच्या प्रांतांपैकी एक म्हणून उदयास आला. मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात स्पेन जर्मेनिक अंमलाखाली आला. पुढे अरबांच्या आक्रमणानंतर जवळजवळ संपूर्ण स्पेन अरब साम्राज्याचा भाग होऊन मुस्लिम अंमलाखाली आला. उत्तरेकडील ख्रिश्चन राज्यांनी प्रदीर्घ लढा देऊन हळूहळू मुस्लिम अंमलाचे उच्चाटन केले आणि १४९२ पर्यंत हा प्रदेश अरब साम्राज्यातून पूर्णपणे मुक्त केला. त्याचवर्षी ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला आणि स्पेनच्या जागतिक साम्राज्याची सुरूवात झाली. सोळाव्या शतकापर्यंत स्पेन हे युरोपातील सर्वात शक्तिशाली राज्य म्हणून प्रस्थापित झाले आणि हा दबदबा सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत कायम राहीला. मात्र सततच्या युद्धांमुळे आणि इतर अंतर्गत प्रश्नांमुळे साम्राज्याचे विघटन झाले. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत स्पेनमध्ये हुकुमशाही प्रस्थापित झाली आणि देशाला आर्थिक व राजकीय स्थैर्य प्राप्त झाले. १९८६ मध्ये युरोपीय महासंघात सामील झाल्यापासून स्पेनने आर्थिक व सांस्कृतिक नवनिर्मितीचा काळ अनुभवला आहे.
[संपादन] नावाची व्युत्पत्ती
स्पेनचे खरे नाव एस्पान्या असून स्पेन हा त्याचा इंग्लिश उच्चार आहे. रोमन काळात हा प्रदेश हिस्पानिया म्हणून ओळखला जात होता व या नावावरून एस्पान्या हे नाव पडले. ग्रीक या प्रदेशास इबेरिया (इबेर (एब्रो) नदीचा प्रदेश) म्हणून ओळखत होते. हिस्पानिया या नावाचा पहिला उल्लेख ई.स.पूर्व २०० व्या शतकात केला गेल्याचे आढळते. पाचवा एनो नावाच्या कवीने प्रथम हा शब्द वापरला. हिस्पानिया हा लॅटिन शब्द आहे, मात्र या शब्दाचा उगम कसा झाला याबाबत मतभेद आहेत कारण लॅटिन भाषेत याचे संदर्भ मिळत नाहीत. (संदर्भ)
[संपादन] प्रागैतिहासिक आणि रोमनपूर्व काळ
मुख्य लेख: प्रागैतिहासिक स्पेन
सुमारे ३५,००० वर्षांपूर्वी आधुनिक मानवाने क्रो-मॅग्नन मानवाच्या रुपात इबेरियन द्वीपकल्पावर पहिल्यांदा पाऊल ठेवले. आधुनिक मानवाच्या सुरूवातीच्या वसाहती पिरेनिस पर्वतांमध्ये होत्या. उत्तर स्पेनमध्ये कान्ताब्रिया संघातील आल्तामिरा गुहा अशा वसाहतींपैकी आहे. ही गुहा आपल्या भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. या भित्तिचित्रांची निर्मिती सुमारे १५,००० वर्षांपूर्वी केली गेली असावी असा अंदाज आहे. आधुनिक मानवाच्या आगमनापूर्वी काही लाख वर्षे या प्रदेशात निअँडरथल मानवाची वस्ती असल्याचे पुरावे आतापुएर्सा येथील उत्खननात मिळाले आहेत.
इबेरियन आणि केल्ट ह्या रोमनपूर्व काळात स्पेनमधील मुख्य जमाती होत्या. इबेरियन लोक दक्षिणेस भूमध्य समुद्राच्या किनारी प्रदेशात व केल्ट उत्तरेस अटलांटिक समुद्राच्या किनारी प्रदेशात रहात होते. द्वीपकल्पाच्या मध्यभागात या दोन्ही जमातींच्या मिश्र वस्त्या होत्या ज्या केल्टायबेरियन म्हणून ओळखल्या जातात. स्पेनमधल्या अनेक शहरांची नावे या जमातींच्या मूळ वसाहतींच्या नावांवरून अस्तित्वात आली आहेत. उदा.- एल्चे (मूळ लिसि), लेरिदा (मूळ लेर्दा). स्पेनमधल्या सर्वात लांब नदीला एब्रो हे नावदेखील इबेरियन लोकांमुळे पडले. ह्या दोन मुख्या जमाती वगळता इतर वंशिक समूहांच्या वस्त्या सध्याच्या आंसालुसिया संघातील मैदानी प्रदेशात होत्या.
ख्रिस्तपूर्व ५०० ते ३०० दरम्यान ग्रीक आणि फिनिशियन व्यापार्यांनी आपल्या वखारी आणि व्यापारी वसाहती भूमध्य समुद्राच्या किनारी प्रदेशात उभारल्या. पुढे यांपैकी काही वसाहतींचा विकास होऊन आजची स्पॅनिश शहरे उदयास आली. मालागा, आम्पुरियास, आलिसान्ते ही त्यांपैकी काही शहरे आहेत. उत्तर आफ्रिकेतील फिनिशियन वसाहतींमधून उदयास आलेल्या कार्थेज साम्राज्याने पुढे संपूर्ण इबेरियन द्वीपकल्पावर ताबा मिळवला आणि या प्रदेशास नवीन कार्थेज (कार्तागो नोवा) असे नाव दिले. सध्याच्या कार्ताहेना या शहराचे नाव मूळ कार्तागो नोवा या शब्दावरून आले. बार्सेलोना हे विख्यात शहर कार्थेज राजा हमिल्कर बार्का याने वसविले. आपल्या कुटुंबाच्या नावावरून त्याने या शहरास बार्सिनो हे नाव दिले, ज्यावरून बार्सेलोना हे नाव आले.
[संपादन] रोमन काळ
मुख्य लेख: हिस्पानिया
दुसर्या प्युनिक युद्धादरम्यान (साधारणतः इ.स.पूर्व २१० ते २०५ दरम्यान) रोमन साम्राज्याने भूमध्य समुद्राच्या किनार्यालगत असणार्या सर्व कार्थेज वसाहती आपल्या ताब्यात घेतल्या, ज्यामुळे पुढे संपूर्ण इबेरियन द्वीपकल्प रोमनांच्या नियंत्रणाखाली आला. सुमारे ५०० वर्षे टिकलेल्या या अंमलाचे श्रेय रोमन कायदा, भाषा आणि त्यांनी बांधलेल्या रस्त्यांच्या जाळ्याकडे जाते. मूळनिवासी असलेल्या केल्ट आणि इबेरियन लोकांचे टप्प्याटप्प्याने रोमनीकरण झाले तसेच त्यांच्या स्थानिक प्रमुखांचा रोमन अभिजनवर्गात प्रवेश झाला.
रोमनांनी आधीपासून अस्तित्वात असलेल्या लिस्बन(Olissis bona ओलिसिस बोना), तारागोना(Tarraco ताराको) या शहरांचा विकास केला तसेच अनेक नवीन शहरे देखील वसवली. उदा.:झारागोझा(Caesaraugusta सेयासाराउगुस्ता), मेरिदा(Augusta Emerita औगुस्ता एमेरिता), वालेन्सिया(Valentia वालेन्तिया), लेओन(Legio Septima लेजिओ सेप्तिमा), बादाखोस(Pax Augusta पाक्स औगुस्ता), आणि पालेन्सिया("Παλλαντία Pallas" Ateneia पालास आतेनेइया).
रोमान अंमलाखाली या प्रांताची अर्थव्यवस्था भरभराटीस आली. हिस्पानिया म्हणून ओळखला जाणार्या ह्या प्रांताची रोमन साम्राज्याचे धान्याचे कोठार म्हणून ओळख निर्माण झाली. या प्रांताच्या बंदरांमधून सोने, लोकर, ऑलिव्ह तेल, आणि वाईन यांची निर्यात सुरू झाली. कालवे व सिंचन प्रकल्पांमुळे या प्रदेशातील कृषी उत्पादन वाढले; यातील काही आजही अस्तित्वात आहेत. सम्राट त्राहान, सम्राट थिओडोसियस पहिला व तत्ववेत्ता सेनेका यांचा जन्म हिस्पानियात झाला. इसवी सनाच्या पहिल्या शतकात येथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू झाला आणि त्याला दुसर्या शतकाखेरीस लोकप्रियता मिळाली. वर्तमान स्पेनमधल्या भाषा, धर्म, परंपरा आणि कायदे यांचा उगम या काळात शोधता येऊ शकेल.
रोमन साम्राज्याच्या अस्ताला सुरूवात झाल्यानंतर, जर्मेनिक रानटी टोळ्यांनी ५व्या शतकात हिस्पानियावर हल्ले करण्यास प्रारंभ केला. व्हिसिगॉथ, सुएबि, व्हॅन्डल आणि अलन या टोळ्या पिरेनिस पर्वत ओलांडून स्पेनमध्ये आल्या. रोमनीकरण झालेले व्हिसिगॉथ इ.स.४१५ मध्ये स्पेनमधे आले. या एकाधिकारशाहीने रोमन कॅथोलिक धर्म स्वीकारल्यानंतर ईशान्येस विखुरलेले सुएबि आणि आग्नेयेस विखुरलेले बायझंटाईन टापू जिंकून इबेरियन द्वीपकल्पाच्या बर्याच मोठ्या भागावर ताबा मिळवला.
[संपादन] अरेबियन स्पेन
[संपादन] स्पेनचे एकत्रीकरण
[संपादन] स्पॅनिश साम्राज्याचा उदय
[संपादन] नेपोलियनचे आक्रमण
[संपादन] विसावे शतक
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] भूगोल
मुख्य लेख: स्पेनचा भूगोल
क्षेत्रफळाच्या हिशोबात स्पेन हा जगात ५१व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. ५,०४,७८२ किमी² क्षेत्रफळाचा हा देश आकाराने तुर्कमेनिस्तानाइतका असून अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यापेक्षा मोठा आहे. इबेरियन द्वीपकल्पाचा ८४% भाग स्पेनने व्यापलेला आहे.
[संपादन] चतु:सीमा
स्पेनच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, दक्षिणेस जिब्राल्टर व मोरोक्को आणि ईशान्येस फ्रान्स ह्यांना लागून आहेत. सेयुता आणि मेलिया ही स्पेनची दोन शहरे उत्तर आफ़्रिकेत मोरोक्कोस लागून आहेत.
स्पेनच्या ईशान्येस पिरेनीस पर्वतरांग असून फ्रान्स आणि आंदोरा संस्थानाच्या सीमा ह्या पर्वतरांगेला समांतर आहेत. कातालोनिया राज्यातील फ्रेंच सीमेजवळील यिविया हे शहर पिरेनीस पर्वतांमध्ये असून तीन बाजूंनी फ्रान्सने वेढलेले आहे. अटलांटिक महासागरातील कॅनेरी बेटे आणि भूमध्य समुद्रातील बालेआरिक बेटे तसेच जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीजवळ असलेली आणि प्लाझास दे सोबेरानिया (स्वैर भाषांतर: आधिपत्याखालील जागा) म्हणून ओळखली जाणारी चाफारिने, अल्बोरान, वेलेझ, आलुसेमास, पेरेहिल ही आणि इतर अनेक निर्जन बेटे स्पेनच्या अंकित आहेत.
[संपादन] भौगोलिक संरचना
स्पेनला सुमारे ४,९६४ किमी (एकूण सीमेच्या ८८%) लांबीचा किनारा लाभलेला आहे, तर जमिनीवरील सीमेची लांबी १,९१७.८ किमी (एकूण सीमेच्या १२%)आहे. उत्तरेस बिस्के, पश्चिमेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस भूमध्य समुद्र व जिब्राल्टरची सामुद्रधुनी आणि आग्नेयेस बालेआरिक समुद्र आहे. कमीतकमी १३ किमी रुंद असलेल्या जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने स्पेन आणि युरोप खंडाला उत्तर आफ्रिकेपासून वेगळे केले आहे. स्पेनला लाभलेल्या सागरतटांपैकी भूमध्य समुद्रकिनार्याची लांबी १,६६० किमी व अटलांटिक किनार्याची लांबी ७१० किमी आहे.
या देशाचा बराचसा भाग पर्वतरांगा आणि पठारांनी व्यापलेला आहे. स्पेनमधील सिएरा नेवाडा (हिमपर्वत) ही पर्वतरांग प्रसिद्ध आहे. सुमारे ४५० किमी लांबीची पिरेनीस पर्वतरांग उत्तरेस बिस्के समुद्रापासून सुरू होऊन दक्षिणेस भूमध्य समुद्राजवळ येऊन संपते. फ्रान्स व स्पेन यांची सीमा या पर्वतरांगेला समांतर आहे. स्पेनचा मध्यभाग पर्वतरांगांनी वेढलेल्या मेसेता नावाच्या, सुमारे ६१० ते ७६० मीटर उंचीच्या पठाराने व्यापलेला आहे. ह्या पर्वतांमधून उगम पावणार-या जवळजवळ १८०० नद्यांपैकी ताहो, एब्रो, दुएरो, ग्वादिना आणि ग्वादाल्किविर ह्या स्पेनमधल्या मुख्य नद्या आहेत. स्पेनमधली सर्वात लांब असलेली तागुस ही नदी ९६० किमी लांब आहे. भूमध्य समुद्राला मिळणार्या एब्रो नदीचा अपवाद वगळता इतर सर्व नद्या अटलांटिक महासागरास जाऊन मिळतात. स्पेनचा किनारी प्रदेश हा मैदानी प्रदेश असून खनिज संपत्तीने समृद्ध आहे. ग्वादाल्किविर नदीच्या खोर्यातील अंदालुसिया राज्यातील मैदानी प्रदेश सर्वात मोठा आहे.
[संपादन] हवामान
भौगोलिक परिस्थितिमुळे स्पेनचे हवामान वैविध्यपूर्ण झाले आहे. येथील हवामानाचे ढोबळमानाने तीन भाग पाडले आहेत.
- भूमध्य सागरी हवामान
[संपादन] राजकीय विभाग
स्पॅनिश राज्यघटनेमध्ये स्पेनची व्याख्या "सर्व स्पॅनिश लोकांच्या स्वयंशासित संस्थानांचा मिळून बनलेला देश" अशी करण्यात आली आहे. या व्याख्येस अनुसरून प्रशासनाच्या दृष्टीने स्पेनचे विभाजन १७ स्वशासित संघांमध्ये करण्यात आले असून या संघांचे पुढे प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागाचे आणि काही लहान संघांचे विभाजन नगरपालिकांमध्ये करण्यात आले आहे. नगरपालिका हा स्पॅनिश प्रशासनाचा मूळ आणि सर्वात लहान घटक आहे. सेयुता आणि मेलिया ही मोरोक्कोजवळील स्पॅनिश शहरे धरून स्पेनमध्ये एकूण ५० प्रभाग आहेत.
संघ आणि प्रभाग सूची:
संघाचे नाव | राजधानी | प्रभाग | राजधानी |
आंदालुसिया | सेविया | आल्मेरिया कादिझ कोर्दोबा ग्रानादा उएल्वा हाएन मालागा सेविया |
आल्मेरिया कादिझ कोर्दोबा ग्रानादा उएल्वा हाएन मालागा सेविया |
आरागोन | झारागोझा | उएस्का तेरुएल झारागोझा |
उएस्का तेरुएल झारागोझा |
आस्तुरिया संस्थान | ओविएदो | आस्तुरिया | ओविएदो |
बालेआरिक बेटे | प्लामा दे मायोर्का | बालेआरिक बेटे | प्लामा दे मायोर्का |
बास्के प्रभाग | बितोरिया-गास्तेइझ | आल्बा गिपुझ्कोआ बिस्काया |
बितोरिआ सान सेबास्तिआन बिल्बाओ |
कॅनेरी बेटे | सांताक्रूझ दे तेनेरिफॆ आणि लास पाल्मास | सांताक्रूझ दे तेनेरिफॆ लास पाल्मास |
सांताक्रूझ दे तेनेरिफॆ लास पाल्मास दे ग्रान कानारिआ |
कान्ताब्रिया | सान्तान्देर | कान्ताब्रिया | सान्तान्देर |
कास्तिया ला’मान्चा | तोलेदो | आल्बासेते सिउदाद रेआल सुएन्का ग्वादालाहारा तोलेदो |
आल्बासेते सिउदाद रेआल सुएन्का ग्वादालाहारा तोलेदो |
कास्तिया इ लिओन | वायादोलिद | आबिला बुर्गोस लेओन पालेन्सिआ सालामान्का सेगोबिआ सोरिआ बायादोलिद झामोरा |
आबिला बुर्गोस लेओन पालेन्सिआ सालामान्का सेगोबिआ सोरिआ बायादोलिद झामोरा |
कातालोनिया | बार्सेलोना | बार्सेलोना गेरोना लेरिदा तारागोना |
बार्सेलोना गेरोना लेरिदा तारागोना |
एस्त्रेमादुरा | मेरिदा | बादाहोझ कासेरेस |
बादाहोझ कासेरेस |
गालिसिया | सान्तियागो दे कोम्पोस्तेला | ला कोरुन्या लुगो ओरेन्से पोन्तेवेद्रा |
ला कोरुन्या लुगो ओरेन्से पोन्तेवेद्रा |
ला’रिओहा | लोग्रोन्यो | ला’रिओहा | लोग्रोन्यो |
माद्रिद | माद्रिद | माद्रिद | माद्रिद |
मुर्सिया प्रांत | मुर्सिया | मुर्सिया | मुर्सिया |
नावारे संघ | पाम्पलोना | नावारे | पाम्पलोना |
वालेन्सिया | वालेन्सिया | आलिकान्ते कास्तेयोन वालेन्सिआ |
आलिकान्ते कास्तेयोन वालेन्सिआ |
[संपादन] मोठी शहरे
नाव | राज्य | लोकसंख्या |
माद्रिद | माद्रिद | ५८,४३,०४१ |
बार्सेलोना | कातालोनिया | ४६,८६,७०१ |
वालेन्सिया | वालेन्सिया | १६,२३,७२४ |
सेविया | आंदालुसिया | १३,१७,०९८ |
मालागा | आंदालुसिया | १०,७४,०७४ |
बिल्बाओ | बास्के | ९,४६,८२९ |
- माद्रिद - स्पेनच्या मध्यभागी मान्सानारेस नदीकाठी वसलेले माद्रिद हे शहर स्पेन आणि माद्रिद संघाची राजधानी आहे. माद्रिद हे स्पेनमधले सर्वात मोठे शहर आहे. राजधानी असल्यामुळे हे शहर स्पेनमधले मुख्य राजकीय केंद्र आहे. स्पॅनिश संसद आणि स्पेनच्या अध्यक्षांचे निवासस्थान या शहरात आहे.
- बार्सेलोना - स्पेनमधले दुसरे सर्वात मोठे शहर असलेले बार्सेलोना शहर भूमध्य समुद्राच्या किनारर्यावर, योब्रे आणि बेसोस नद्यांच्या मुखाशी आणि कोयसेरोला पर्वताच्या पूर्व पायथ्याशी वसलेले आहे. बार्सेलोना ही कातालोनिया संघाची राजधानी आहे. युरोपातील प्रमुख बंदरांपैकी एक आणि स्पेनमधला दुसरा सर्वात मोठा विमानतळ असलेले हे शहर स्पेनचे मुख्य आर्थिक केंद्र आहे.
- वालेन्सिया - स्पेनमधले तिसरे आणि युरोपातील १५वे सर्वात मोठे शहर असलेले वालेन्सिया शहर हे वालेन्सिया संघ आणि वालेन्सिया प्रांत यांची रजधानी आहे.
- सेविया - ग्वादालकिविर नदीच्या खोरर्यात वसलेले सेविया शहर दक्षिण स्पेनमध्ये आहे. आंदलुसिया संघ आणि सेविया प्रांताची, तसेच स्पेनची आर्थिक राजधानी असलेले हे शहर कला व संस्कृती यांचे केंद्र आहे.
- मालागा - मालागा शहर ग्वादलमेदिना आणि ग्वादालोर्से नद्यांदरम्यान आगार्किया टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले आहे. दक्षिण स्पेनमधले आंदलुसिया संघातले हे शहर स्पेनमधले एक बंदर असून भूमध्य समुद्राच्या, कोस्ता देल सोल (सूर्यकिनारा) म्हणून ओळखल्या जाणार्या किनार्याजवळ आहे.
- बिल्बाओ - उत्तर स्पेनमधले, नेर्बिओन नदीकाठी वसलेले बिल्बाओ शहर बास्के प्रभाग आणि बिस्काया प्रांत यांची राजधानी आहे. हे शहर स्पेनमधले मुख्य औद्योगिक शहर आहे.
[संपादन] समाजव्यवस्था
[संपादन] प्रशासन
[संपादन] वस्तीविभागणी
[संपादन] धर्म
[संपादन] शिक्षण
[संपादन] संस्कृती
[संपादन] भाषा
मुख्य लेख: स्पॅनिश, स्पेनमधल्या भाषा
स्पॅनिश (एस्पान्योल किंवा कास्तेयानो ) ही स्पेनमधली मुख्य भाषा आहे आणि संपूर्ण स्पेनमध्ये बोलली जाते. स्पॅनिश घटनेमध्ये हिला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला गेला आहे. जगात स्पॅनिश हे नाव जरी प्रचलित असले तरी स्पेनमधे आणि स्पॅनिश बोलणर्या लोकांमध्ये ती कास्तेयानो (कास्तेया प्रदेशातील भाषा) म्हणून ओळखली जाते. स्पॅनिश घटनेने कास्तेयानो हे नाव अधिकृत म्हणून स्वीकारले आहे. स्पॅनिश एकूण २१ देशांमध्ये बोलली जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषांमध्ये स्पॅनिशचा समावेश आहे.
स्पॅनिश वगळता स्पेनमध्ये इतरही अनेक भाषा बोलल्या जातात. अशा एकूण सहा स्वतंत्र भाषा आहेत, ज्या अधिकृत भाषा म्हणून स्वीकारल्या गेल्या आहेत.
- अरेनिज (आरानेस), ओक्सितान या भाषेची बोली भाषा.
- आरागोनेज (घटनेनुसार अधिकृत दर्जा नाही मात्र मोठ्या प्रमाणावर बोलली जाते)
- अस्तुरियन (आस्तुरिआनु)
- बास्के (एउस्केरा)
- कातालान (काताला), वालेन्सियामध्ये ही भाषा वालेन्सियन म्हणून ओळखली जाते.
- गॅलिसियन (गालेगो)
ह्या सहा भाषा वगळता स्पेनमध्ये आस्तुर-लेओनेज, लेओनेज, एस्त्रेमादुरन, कान्ताब्रियन अशा बोलीभाषा देखील छोट्या प्रमाणावर बोलल्या जातात.
[संपादन] राजकारण
[संपादन] अर्थतंत्र
[संपादन] संदर्भ
http://en.wikipedia.org/wiki/spain
http://es.wikipedia.org/wiki/españa
युरोपातील देश व संस्थाने |
---|
अझरबैजान1 · आइसलँड · आर्मेनिया2 · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा4 · ऑस्ट्रिया · कझाकस्तान1 · कोसोवो5 · क्रोएशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया1 · डेन्मार्क3 · तुर्कस्तान1 · नेदरलँड्स3 · नॉर्वे3 · पोर्तुगाल3 · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बोस्निया आणि हर्जेगोविना · माल्टा · मोनॅको4 · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · मॉन्टेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम3 · रशिया1 · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन4 · लिथुआनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस2 · स्लोव्हेकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी महत्त्वाचे: (1) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (2) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (3) युरोपबाहेरील लांबवरचे काही भाग या देशांच्या अखत्यारीत (Overseas Territorise); (4) स्वायत्त संस्थाने (Principalities). (5) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही. |
स्पेनचे प्रशासकीय विभाग | |
---|---|
स्पेनमधले स्वायत्त संघ स्वायत्त शहरे | प्लाझास दे सोबेरानिया |
![]() |