अहमदनगर
Wikipedia कडून
?अहमदनगर महाराष्ट्र • भारत |
|
|
|
गुणक: | |
प्रमाणवेळ | IST (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
८५.१४ km² (३३ sq mi) • ६५६.५४ m (२,१५४ ft) |
जिल्हा | अहमदनगर |
लोकसंख्या • घनता • लिंग गुणोत्तर • साक्षरता टक्केवारी |
३०७,४५५[१] (२००१) • ३,६११/km² (९,३५२/sq mi) • १.०८ • ७७.५२% |
महापौर | संदीप कोटकर |
आयुक्त | रमेश पवार |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४१४,००१ • +0241 • MH 16,17 |
संकेतस्थळ: अहमदनगर संकेतस्थळ | |
गुणक:
अहमदनगर शहर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सीना नदीच्या काठावर वसलेले आहे जे पुण्यापासून ईशान्येकडे साधारणपणे १२० कि.मी. वर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
इ.स.१४९४ मध्ये अहमद शाह निझाम शाह ने पूर्वीच्या भिंगार शहराजवळ अहमदनगर शहर वसवले. मोगल बादशहा शाहजहान ने इ.स.१६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर १८१७ रोजी ब्रिटिशांनी अहमदनगरावर विजय मिळवला. शहरात अहमदनगरचा किल्ला, रेणुकामाता मंदिर (केडगांव) व चांदबीबी महल अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या शहराला नगर या नावानेसुद्धा ओळखतात.
[संपादन] भूगोल
अहमदनगरचे जगाच्या नकाशावरचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे व समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.
[संपादन] प्रसिद्ध व्यक्ती
- संत ज्ञानेश्वर - यांनी अहमदनगरजवळील नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली.
- साईबाबा - हे अहमदनगरजवळील शिर्डी ही कर्मभूमी असणारे संत होते.
[संपादन] वाहतूक व्यवस्था
मुंबई - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर शहरातून जातो. अहमदनगर हे पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नासिक, बीड या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी राज्य महामार्गांनी जोडले गेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अहमदनगरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत.
दौड-मनमाड लोहमार्गावरील अहमदनगर हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथून जाणार्या सर्व प्रवासी रेल्वेगाड्या अहमदनगरला थांबतात. अहमदनगरचे रेल्वे वेळापत्रक [1]येथे पहा.
[संपादन] पर्यटन स्थळे
- विशाल गणपती मंदिर - हे नगरचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर अहमदनगरच्या माळीवाडा भागात आहे.
- रेणुकामाता मंदिर (केडगांव) - हे मंदिर केडगाव येथे आहे. ते अहमदनगर रेल्वेस्थानकापासून साधारणपणे ३ किलोमीटरवर आणि अहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे.
- भुईकोट किल्ला - १९४२ मधे येथे भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेव्हा त्यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हे पुस्तक लिहिले.
- सिद्धटेक - येथील सिद्धिविनायक मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक आहे.
- शिर्डी - हे ठिकाण साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
- शनी शिंगणापूर - येथे शनीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची भावना आहे. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे येथे आजतागायत एकाही चोरीच्या घटनेची नोंद झालेली नाही.
- हरिश्चंद्रगड - एक ऐतिहासिक किल्ला. हा नगरपासून ....... किलोमीटरवर आहे.
[संपादन] हे सुद्धा पहा
[संपादन] संदर्भ
|
||
---|---|---|
राजधानी | मुंबई | ![]() |
विषय | इतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन | |
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशिम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर | |
मुख्य शहरे | औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • सोलापूर | |
मुख्यमंत्री | वाय. चव्हाण · एम. कन्नमवार · वी. नाईक · एस. चव्हाण · वी. पाटील · एस. पवार · ए. आर. अंतुले · बी. भोसले · एस. निलंगेकर · एस. नाईक · एम. जोशी · एन. राणे · वी. देशमुख · एस. शिंदे |