रत्नागिरी जिल्हा

Wikipedia कडून

हा लेख रत्नागिरी जिल्ह्याविषयी आहे. रत्नागिरी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
रत्नागिरी जिल्ह्याचे स्थान
रत्नागिरी जिल्ह्याचे स्थान

'रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील हा कोकण विभागातील एक जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हासांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे.

प्रमुख पिके- भात, काजू, हापूस आंबे व नारळ


रत्नागिरी जिल्हा लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, पांडुरंग काणे अशा महान लोकांची जन्मभूमि आहे. रत्नागिरीचे हापूस आंबे जगप्रसिध्द आहेत. जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी असते. जिल्ह्याची लोकसंख्या १६,९६,७७७ तर साक्षरता ६६.१३% आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ८,२०८ चौ.कि.मी आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे: रत्नागिरी (शहर), गणपतीपुळे, संगमेश्वर, जयगड, गुहागर, चिपळूण, पावस.

हे सुध्दा पहा

[संपादन] जिल्ह्यातील तालुके

  1. मंडणगड
  2. दापोली
  3. खेड
  4. चिपळूण
  5. गुहागर
  6. संगमेश्वर
  7. रत्नागिरी
  8. लांजा
  9. राजापूर

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाहेरील दुवे

इतर भाषांमध्ये