On Amazon.it: https://www.amazon.it/Complete-Concordances-James-Bible-Azzur/dp/B0F1V2T1GJ/


महाराष्ट्र पर्यटन - विकिपीडिया

महाराष्ट्र पर्यटन

Wikipedia कडून

महाराष्ट्र भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, व्यापारी अशा सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासाच्या दृष्टीने चांगले लोहमार्ग, पक्क्या सडका, चांगली आणि स्वस्त क्षुधाशांतिगृहे, धर्मशाळा यांची इथे रेलचेल आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] जिल्हा

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पर्यटनस्थळे खालील प्रमाणे.

[संपादन] अहमदनगर

[संपादन] अकोला

[संपादन] अमरावती

चिखलदरा तालुक्यातील मेळघाट हा भाग वनश्रीने नटलेला आहे. महाराष्ट्राच्या मोजक्या अभयारण्यापैकी १५०० चौ.किलोमीटरपक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या मेळघाट अभयारण्यातील व्याघ्र प्रकल्प अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने आखलेला आहे. सिमाडोह ह्या जवळच्या गावी राहण्याची सोय वनखात्याने केली आहे. त्यासाठी पूर्वकल्पना देऊन आरक्षण करावे लागते. झोपडी (कॉटेज) हा प्रकार अत्यंत स्वस्त असून राहण्याचे भाडे प्रतिदिन ३५/- रु. आहे. जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था असून जंगलातले वातावरण पूर्णपणे अनुभवायला हे एक उत्तम ठिकाण आहे. वन्य प्राण्यांशी संबंधित वस्तुसंग्रहालय तेथे असून रात्री व्याघ्र-जीवनावरचा लघुपट पडद्यावर दाखवला जातो. चिखलदराच्या पायथ्याशी असलेल्या सिमाडोहला जाण्यासाठी स्वतःचे वाहन असणे नेहमी चांगले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवाराच आहे. वाहन शक्यतो चारचाकी असल्यास आत खोलवर जंगलात जाता येते. वन्यजीव निरीक्षणाचा सर्वात उत्कृष्ट काळ म्हणजे एप्रिल व मे महिना. ह्या काळात पाण्याची वानवा असल्याने वनखाते संरक्षित जीवांसाठी कृत्रिम पाणवठे उपलब्ध करतात. तेथे थोडी प्रतीक्षा केल्यावरच अनेक वन्यजीव बघता येतात. जागोजागी मचाणे बांधून पर्यटकांची सोय करण्यात आलेली आहे. तरस, नीलगाय सारखे काही प्राणीच हिवाळ्यात बघायला मिळतात. चिखलदरा येथेही राहण्याची उत्कृष्ट सोय आहे. चिखलदरा ह्या थंड हवेच्या ठिकाणी वन्यप्राणिविषयक वस्तुसंग्रहालय खास बघण्यालायक आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या (MTDC) अतिथीगृहासाठी उत्कृष्ट ठिकाण निवडलेले असून पक्षी निरीक्षणाचा आनंद उपभोगता येतो.

[संपादन] औरंगाबाद

औरंगाबादला मुक्काम करून वेरूळ, अजिंठा, बीबी का मकबरा, दौलताबादचा किल्ला तसेच घृष्णेश्वर मंदिर, पैठणचे एकनाथ महाराजांचे मंदिर, पैठण धरण, वृंदावन उद्यानाच्या धर्तीवर बनवलेले पैठण येथील नाथ उद्यान. तसेच जवळच असलेले आणि हळूहळू प्रसिद्ध होत असलेले म्हैसमाळचे हिलस्टेशन आणि तेथील बालाजीचे मंदिर.

[संपादन] बीड

[संपादन] भंडारा

[संपादन] बुलढाणा

[संपादन] चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर, अंचलेश्वर आणि गोंड राजांचे समाधिस्थळ ही प्रसिद्ध स्थळे. एक अप्रसिद्ध परंतु अतिशय सुंदर शिल्पकलेने नटलेले लहानसे शिवमंदिर बाजाराजवळ एका गल्लीत आहे. http://www.rajendrapradhan.com/photo/markanda.htm येथे तुम्हाला ह्या स्थळांची छायाचित्रे बघता येतील.ह्याशिवाय चंद्रपुरातील एक अप्रसिद्ध परंतु आवर्जून बघण्यासारखे स्थळ म्हणजे रायप्पा कोमटी ह्यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बांधकाम सुरू केलेले पण अपूर्ण राहिलेले मंदिरस्थळ. येथे महाकाय मूर्ती ऊन्ह, धूळ आणि पावसाचा मारा सहन करीत उघड्यावर पडून आहेत. जवळपास तीस फूट उंचीच्या नवमुखी दुर्गेच्या मूर्तीला रावण समजून दसर्‍याच्या दिवशी लोक दगड मारीत. त्यामुळे मूर्तीला क्षती पोचली आहे. ह्याशिवाय महाकाय आकारच्या गणपती, वराह, मत्स्य आणि इतर मूर्ती तिथे आहेत.

[संपादन] धुळे

[संपादन] गडचिरोली

[संपादन] गोंदिया

[संपादन] हिगोली

येथून २० कि.मी. अंतरावर औंढा तालुकयामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग "नागनाथ" हे पांडवकालीन मंदिर आहे. हे मंदिर सुमारे ५५०० वर्षांपूर्वीचे असून औरंगजेब राजाने हल्ला करून बरीच नासधूस केली होती. शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

[संपादन] जळगांव

[संपादन] जालना

[संपादन] कोल्हापूर

[संपादन] लातूर

[संपादन] मुंबई

[संपादन] नागपूर

[संपादन] नांदेड

नांदेड हे मराठवाड्यातले क्र. २ चे शहर गोदावरीनदीच्या तीरावर वसले आहे.शीख पंथाचे दहावे गुरू, गुरू गोबिंदसिंग, यांचा शेवट नांदेड शहरी झाला. म्हणून येथील गुरुद्वाराला विषेश महत्त्व आहे. शीख पंथातील चार मुख्य अमृतसर, ग्वाल्हेर,नांदेड हे आणि अजून एक (?) यांपैकी हे गुरूद्वार आहे.

[संपादन] नंदुरबार

[संपादन] नाशिक

[संपादन] उस्मानाबाद

[संपादन] परभणी

[संपादन] पुणे

[संपादन] सिंहगड

पुण्यापासून अंदाजे ३०-३५ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला नावाप्रमाणेच भक्कम आहे. तानाजी मालुसरे यांच्या सिंहासारख्या कामगिरीमुळे मूळच्या कोंडाणा किल्ल्याचे नाव 'सिंहगड' झाले. गडावरील देव टाके थंड आणि गोड पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. गडावर राजाराम महाराज यांची समाधी आणि तानाजी मालुसरे यांचे स्मारक आहे. शिवाय मुंबई-दूरदर्शनचा मनोरा, लो. टिळक आणि ग.दि माडगुळकर यांचे बंगलेसुध्दा आहेत.

[संपादन] भुलेश्वर

पुण्यापासून अंदाजे ५० कि.मी. वर भुलेश्वर हे देवस्थान आहे. हे बहुधा पांडवकालीन असावे. मूर्तिकाम पाहण्यासारखे आहे. लढायांच्या धामधुमीत बर्‍यायाच मूर्तींची तोडफोड झालेली दिसते. गणपतीची स्त्री रूपातील भारतातील कदाचित एकुलती मूर्ती या मंदिरात आहे. गाभार्‍यात शिवलिंग आहे. मात्र फक्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. [लढाईचाच परिणाम] पिंडीवरील खोलगट भागात मिठाई किंवा पेढा ठेवल्यास तो खाल्ल्याचा आवाज ऐकू येतो. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे.

[संपादन] कार्ला लेणी

पुण्यापासून अंदाजे ४० किलोमीटरवर वर कार्ल्याची प्रसिध्द लेणी आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकातील आहेत. ही बौद्ध लेणी म्हणजे स्थापत्यशास्त्राचे एक अप्रतिम उदाहरण आहे. तेथेच एकविरा देवीचे मंदिरही आहे. देवीची मूर्ती अतिशय कोरीव असून डोळे अगदी जिवंत वाटतात.

[संपादन] भाजा लेणी

कार्ल्याच्या अगदी विरुद्ध दिशेला लोहमार्गाच्या पलीकडे ही भाजा लेणी आहेत.

[संपादन] बेडसा लेणी

कार्ल्याच्या दक्षिणेस अंदाजे १० कि.मी. अंतरावर, कामशेत रेल्वे स्टेशनजवळ, बेडसे हे छोटे गाव आहे. तेथील लेणी आकाराने छोटी आहेत मात्र आकर्षक आहेत.

[संपादन] तुळापूर

पुण्यापासून अगदी, ३५ - ४० किमी.(?) अंतर असेल. अहमदनगर रस्त्यावर, वाघोली नंतर एक फाटा डाव्या हाताला वळतो. काही अंतरावरच तुळापूर आहे. अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे. श्री. संभाजी महाराजांची समाधी आणि सुमारे १२०० वर्षांचे जुने शिवमंदिर बघण्यासारखे आहे. शिवाय, नावेतून फिरतासुद्धा येते. ३ नद्यांचा संगम आहे.

[संपादन] भंडारा डोंगर

चाकण पासून उजव्या बाजूला जाणारा रस्ता भंडारा डोंगराला जातो... महान संत तुकाराम यांनी आपले लिखाण याच ठिकाणी केले... सोबत तुकाराम मंदिर - गाथा मंदिर असे बरेच काही पाहण्यासारखे आहे.

[संपादन] कानिफनाथ मंदिर

पुण्यापासून अंदाजे १ तासाच्या अंतरावर श्री कानिफनाथ मंदिर आहे. मुख्य समाधिठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे. बापदेव घाट पार करुन वरती मंदिरापर्यंत जाता येते. रविवारी सकाळी आरती व प्रसाद वाटप होते. मंदिराच्या गाभार्‍यायामध्ये फक्त पुरुषांनाच अंगरखा/सदरा उतरवून अंदाजे २/२ मापाच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश करावा येतो.

[संपादन] महादजी शिंदे यांची छत्री

वानवडीमध्ये महादजी शिंदे याची ही राजवाडावजा इमारत आजही मोठ्या डोलात उभी आहे. मंदिराच्या बांधकामामध्ये राजस्थानी कला दिसून येते. रविवार वजा(?) आठवडाभर येथे भेट देता येते. मंदिराच्या आतमध्ये शिंदे घराण्याच्या आजपर्यंतच्या पिढ्यांची छायाचित्रे पहायला मिळतात.

[संपादन] प्रति पंढरपूर

लोहगडाच्या पाठीमागे, पायथ्याशी प्रति पंढरपूर साकारत आहे. 'आधुनिक तुकाराम' म्हणून प्रसिद्ध श्री बाबा महाराज सातारकर यांच्या प्रेरणेतून हे बांधकाम होत आहे.

[संपादन] शेकरूंसाठीचे अभयारण्य भीमाशंकर

निसर्गाचा वरदहस्त लाभलेले भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील एक अद्वितीय ठिकाण आहे. अतिप्राचीन काळापासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर महामूर पाऊस पडतो आहे. भीमाशंकर हे सह्यकण्यावरच वसलेले वृक्ष-वेली-प्राणी-पक्षी-किडे-अभयचर-सरपटणारे अशा जैविक विविधतेने संपन्न असलेले भीमा नदीचं उगमस्थान आहे. जे महत्त्व हिंदुस्थानात गंगा-यमुना-ब्रह्मपुत्रेला तेच महत्त्व महाराष्ट्रात गोदावरी-भीमा-कृष्णा- वैनगंगेला! इथली रमणीयता, उंची आणि पुणे-मुंबई-नाशिकला जवळ असल्याने कोणी कोणी इथे महाबळेश्‍वरसा(?)-- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने इथे येणार्‍या भाविकांना इथले पुजारी आग्रहाने सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्‍न करतात. पुण्यापासून अवघ्या १२० किलोमीटर अंतरावर असणारे भीमाशंकर एसटी बससेवेने पुणे शहराला थेट जोडलेले आहे.

[संपादन] चासकमान

पुणे-नाशिक रस्त्यावरील राजगुरुनगर मार्गे चास या गावी जाता येतं. राजगुरुनगर ते चास सहा आसनी रिक्षा किंवा जीप उपलब्ध असतात. या गावात तटबुरुजांसह एक ऐतिहासिक वाडा आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची सासुरवाडी असणार्‍या जोशी यांची ही गढी. जोशी यांच्या घरातील लाडूबाई ऊर्फ ताईसाहेब यांचा विवाह बाजीराव यांच्याशी झाला. सकलसौभाग्यसंपन्न काशीबाईसाहेब बनून त्या पेशवे कुटुंबात सामील झाल्या. त्याच जोशींचे विद्यमान वंशज या वाड्यात राहतात. अनेक ऐतिहासिक वस्तू त्यांच्याकडे आहेत. ...... चास गावात उजव्या सोंडेच्या गणपतीचे पाठक यांचे मंदिर, पाटणकरांचे लक्ष्मी-विष्णू मंदिर, लघाटे यांचे गणेश मंदिर आणि डौलदार दीपमाळ असलेलं श्री सोमेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये दगडी दीपमाळा आहेत. पण या सोमेश्‍वर महादेवाच्या देवळातील डौलदार दीपमाळ केवळ त्या सम तीच. त्रिपुरी पौर्णिमेला इथे दीपोत्सव होतो. तेव्हा तर दीपवैभव पाहण्यासारखेच असते.

[संपादन] किकलीचे श्री भैरवनाथ मंदिर

पुणे-सातारा या राष्ट्रीय हमरस्त्याने वाई-महाबळेश्‍वरकडे जाताना खंबाटकी घाट उतरल्यावर भुईंज हे गाव लागते. तिथेच डावीकडे चंदन-वंदन किल्ल्यांची जोडी नजरेस पडते. या दोन किल्ल्यांच्या मध्ये एक रुंद खिंड आहे. दोन्ही गडमाथ्यांकडून उतरत आलेले तीन टप्पे पायर्‍यांसारखे दिसतात. किकली गावात देखण्या प्रवेशद्वाराचे, दीपमाळा असणारे, चिरेबंदी बांधणीचे एक शिवमंदिर आहे. त्याला श्री भैरवनाथ मंदिर म्हणतात. खूप कलाकुसर असणारे हे ठिकाण.

[संपादन] निघोजचे रांजणखळगे

ऐन उन्हाळ्यातपण आवर्जून पहावे असे एक ठिकाण पुण्याच्या अगदी जवळच आहे. पुणे-नगर रस्त्यावरील शिरूर ओलांडले, की घोडनदीवरचा पूल लागतो. तिथे पुणे जिल्हा संपतो. पुलापलीकडे नगर जिल्हा आहे. पुलानंतर एखाद-दीड किलोमीटर गेले, की डावीकडे एक रस्ता फुटतो. तेथील फलकावर "निघोज २४ किलोमीटर' असं लिहिलेले आहे. पुणे-निघोज एसटी बस इथूनच जाते. या निवांत रस्त्याने जाताना बाजूची शेते, डेरेदार वृक्ष पाहून मन प्रसन्न होते. थोडे पुढे गेल्यावर आशिया खंडातील बहुधा एकमेव असे बॅसॉल्ट जातीच्या खडकांमधील सर्वांत मोठे रांजण खळगे आहेत. पण अगदी जवळ जाईपर्यंत हे असे इथे काही तरी वैशिष्ट्यपूर्ण आहे याची कल्पनाच येत नाही. नदीकाठाशी पोचले, की रांजणाच्या आकाराचे असंख्य लहान- मोठे खळगे आणि तळाशी पाण्याचा प्रवाह दिसतो.

[संपादन] श्री पांडेश्‍वर मंदिर

जेजुरी- मोरगाव परिसरातील मुद्दाम भेट देण्याजोगे एक ठिकाण म्हणजे जेजुरीपासून दहा किलोमीटरवरील श्री पांडेश्‍वर. मोरगावकडे जाणार्‍या एसटी बस इथे येण्यासाठी उपयुक्त ठरतात. कर्‍हा नदीच्या काठी हे मंदिर आहे. या मंदिराची बांधणी खूप मोठ्या विटांनी केलेली आहे. त्यावर जाड गिलाव्याचा थर आहे. सातवाहनकालीन विटांप्रमाणे या विटा वाटतात. मात्र देवळासमोरचा दगडी मुखमंडप नंतरचा असला तरी तोही सात-आठशे वर्षांपूर्वीचा असावा. या मुखमंडपात २४ देवकोष्टे (कोनाडे) आहेत. त्यातील मूर्ती मात्र गायब आहेत. मंदिराच्या गाभार्‍यासमोर गजपृष्ठाकृती सभामंडप आहे. या सभामंडपाच्या भिंती आणि छत यावर भौमितिक रंगीत नक्षी असून त्यातच काही चित्रे व लेख आहेत. मात्र हे सारे फारच पुसट झाले आहे. भारत इतिहास संशोधक मंडळातील डॉ. गणेश गंगाधर मुजुमदार आणि डॉ. कमल चव्हाण यांनी १९७२-७३ च्या सुमारास या भित्तिचित्रांचा अभ्यास केला होता. अतिशय दुर्मीळ अशा या पुरातन भित्तीचित्रांचा निगुतीने सांभाळ करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. महाभारत, रामायण, कृष्णलीला, शिवलीला, दशावतार हे चित्रविषय तर त्यात आहेतच. पण काही युद्धदृश्‍ये, शिकारीला निघालेला राजपुरुष, दोन राजपुरुषांची भेट, नृत्यसभा, प्रेमीयुगुल यांचीही चित्रे त्यात आहेत. हत्ती, घोडे, हरीण, उंट, कुत्रा, गाय, असे प्राणी, मोर, पोपट आदी पक्षी यांचेही चित्रण त्यात आहे.

[संपादन] सातवाहनांच्या स्मृती जपणारा नाणेघाट

पुण्यातून शंभर किलोमीटरवरचे जुन्नर गाठायचे आणि तेथून घाटघर किंवा अजनावळे गावी जाणारी बस पकडायची. आता जीपची सोयही उपलब्ध आहे. जुन्नर-आपटाळे-चावंड मार्गे घाटघर हा प्रवास जवळचा पण रस्ता अतिशय खराब. त्यामुळे जुन्नर-माणिकडोह मार्गे घाटघर हा लांबचा पण चांगल्या रस्त्याचा पर्याय अधिक स्वीकारार्ह. जुन्नरपासून ३२ किलोमीटर आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याणपासून ६४ किलोमीटर अंतरावर नाणे घाटाचा अनुक्रमे माथा व पायथा आहे. नाणेघाट हा पायर्‍या-पायर्‍यांचा घाट सुमारे पाच किलोमीटर लांबीचा आहे.

[संपादन] सरदार पानसे यांची सोनोरी

आपल्या परिसरात वेळ काढून जाण्यासारखी अशी किती तरी ठिकाणे असतात. तिथे घडलेला इतिहास, त्या ठिकाणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व या गोष्टी विचारात घेऊन अशा ठिकाणी गेले तर आपल्या भेटीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. ........ ..... पुण्याहून सासवडपर्यंत पीएमटी बससेवा तर आहेच, पण दिवे घाटातून सासवडकडे जाणार्‍या सोनोरी फाट्याशी उतरवणार्‍या एसटी बसही उपयुक्त ठरतात. सासवडहून रिक्षा किंवा एसटी बसनेही सोनोरीला येता येते. थोडे पायी चालायची तयारी असेल तर सोनोरी फाटा ते सोनोरी आणि सासवड ते सोनोरी असे चालतही जाता येते.

[संपादन] लोणी भापकरचे वराहमंदिर

भगवान विष्णूचे दशावतार सर्वांनाच परिचयाचे आहेत. त्यांपैकी श्रीराम व श्रीकृष्णाची मंदिरे भारतभर आहेत. वराहमूर्तीचे देवालय फारच क्वचित आढळते. चाकणच्या चक्रेश्‍वरापाशी एक भग्न वराहमूर्ती आहे. रामटेक (नागपूरजवळ) आणि खजुराहो (मध्य प्रदेश) येथेही वराह देवालये आहेत. श्री विष्णुमूर्तींमध्ये प्रभावळीत दशावतार कोरलेले असतील, तर त्यातही वराहशिल्प आढळते. मानवी शरीर आणि वराहमुख अशा नृवराहाच्या मूर्ती असतात किंवा वराह हा पशुरूपातही दाखविलेला आढळतो, त्याला ""यज्ञ वराह म्हणतात. ....... अष्टविनायकांमधील प्रसिद्ध अशा मोरगावच्या मयूरेश्‍वराचे दर्शन घेऊन, जवळच्या आठ-दहा किलोमीटर अंतरावरील लोणी भापकर या गावी जाता येते. गावातील लोकांना दत्तमंदिराची वाट विचारावयाची आणि या भागात यायचे. इथे एक विस्तीर्ण आणि सुबक बांधणीचे कुंड आहे. या कुंडाची उत्तर बाजू इतर बाजूंपेक्षा वेगळी आहे. तिथे वराहमंडप आहे. या आटोपशीर मंडपात पूर्वी वराहमूर्ती होती. केव्हा तरी ती स्थानभ्रष्ट झाली. सध्या ही भग्न मूर्ती याच देवळाच्या पाठीमागील शेतात पडलेली दिसते.

[संपादन] रायगड

[संपादन] किल्ले रायगड

किल्ले रायगड मराठी साम्राजाच्या इतिहासामध्ये एक खास ओळख धरून आहे. शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून १४व्या शतकातल्या रायरी नावाच्या या किल्ल्याला आपल्या साम्राजाची राजधानी बनवले. महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला.

महाराजांच्या पश्चात सुमारे सहा वर्षे रायगड हीच राजधानी होती. गडावर जाण्यसाठी एकच मार्ग आहे. दुसर्‍याया मार्गाने गडावरून उतरणार्‍या 'हिरकणीची' कथा अगदी प्रसिद्ध आहे. गडावर जाण्यासाठी सध्या रस्सी-मार्गा[रोपवे]ची सोय आहे.

[संपादन] रायगडावरील अश्‍मयुगीन गुहा

पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाडगावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोपवेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या बाराशे पायर्‍या चढून गेले, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असं म्हणू लागले आहेत. ...... जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आलं, की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारं दृश्‍य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव, पाचाड ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.

या गुहेत सतत वाहणारा थंडगार वारा, एकापाठोपाठ येणार्‍या थंड वार्‍याच्या झुळुका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्‍मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचं एखादे नैसर्गिक ठिकाण निश्‍चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्ग यात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्‍मयुगीन मानवाचे जुने वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा याचे आकर्षण इथे भेट देणार्‍याला पडतेच पडते.

रायगड म्हणजे दुर्गदुर्गेश्‍वर. महाराष्ट्राचा सर्वांत वैभवशाली किल्ला. शाळा- महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर येतात. काही जण दोरवाटेने पाळण्यात बसून जातात, तर काही हजार-बाराशे पायर्‍या चढून रायगडावर पोचतात. त्या सर्वांनी हे वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा अवश्‍य पाहिली पाहिजे.

[संपादन] रत्‍नागिरी

गणपतीपुळे

येथील स्वयम्भू गणेश, देखणे मन्दिर आणि रम्य समुद्रकिनारा पूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकाना आकर्षित करतो.

[संपादन] सांगली

[संपादन] सांगली

सांगली शहराचे आद्य दैवत असलेले गणपती मंदिर येथील एक श्रद्धास्थान आहे. सांगलीचे संस्थानिक पटवर्धन राजे यांनी बांधलेल्या या मंदिराचे बांधकाम पंचायत पद्धतीचे आहे. या मंदिराच्या सभोवती आणखी ४ मंदिरे आहेत--सूर्यनारायण, चिंतामणि...आणखी इतर दोन. मंदिरातील 'बबलू' नावाचा हत्ती प्रसिद्धच आहे. त्याच्यासाठी खास दूरदर्शनची सोय आहे. बबलूच्या 'डिस्कव्हरी' व 'ऍनिमल प्लॅनेट' या आवडत्या वाहिन्या आहेत. लहान तसाच मोठ्यांचाही बबलू आवडता आहे. मंदिराच्या प्रबंधक समितीने केलेल्या सुधारणांमुळे मंदिराचा परिसर नयनरम्य आहे. बबलू हत्तीच्या राहण्याच्या ठिकाणाजवळ 'केंगणेश्वरी' देवीचे मंदिर आहे, सांगलीतील बर्‍याच कुळांची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या मालकीचे उंट, घोडे, ससे इ. प्राणीही येथे आहेत. एक प्रेक्षणीय स्थळ...

[संपादन] हरिपूर

सांगलीपासून जवळच 'बागेचा गणपती' म्हणून आणखी एक गणपती मंदिर आहे. हे खरे संस्थानिकांचे पूर्वीपासूनचे दैवत. येथूनच पुढे हरिपूर नावाचे छोटे गाव आहे. येथिल शिवमंदिर प्रसिद्ध आहे. श्रावण मासात दर सोमवारी येथे जत्रा भरते. वरील तीनही स्थळे कृष्णेच्या काठी आहेत.

[संपादन] औदुंबर

नृसिंहवाडी, श्रीक्षेत्र औदुंबर (श्री दत्त देवस्थान ), आष्टा (श्रीरामांनी दंडकारण्यातील वास्तव्यात स्थापन केलेली आठ शिवलिंगे येथे आहेत - शिवलिंगाच्या साळुंकीवर धनुष्य-बाण कोरलेले आहेत)

[संपादन] सिंधुदुर्ग

[संपादन] सातारा

[संपादन] वडगाव (पोतनीस)

ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळ व भव्य मंदिरे पाहावयास मिळणारे वडगाव (पोतनीस) हे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्‍यात आहे. पुण्यापासून ५० किलोमीटरवर बंगळूर- सातारा रस्त्यावर हे गाव आहे. शिरवळ महाविद्यालयापासून लोहोम-मांढरदेवकडे जाणार्‍या रस्त्यावर नायगावच्या पुढे ते येते. आजूबाजूस डोंगरकपारी आहेत. ....... म्हैसूरचे टिपू सुलतान व पेशवे यांच्या सैन्यांत श्रीरंगपट्टण येथे झालेल्या लढाईत पोतनीस यांचे काही जवान कामी आले; तसेच राक्षस भुवन येथील निजामाशी झालेल्या लढाईत पोतनीस यांचे युवक शहीद झाले. या दोन्ही लढायांत पेशव्यांना विजय मिळाला. त्या वेळी श्रीमंत माधवराव पेशव्यांनी वडगाव व आसपासच्या पाच गावांतील जमिनी इनाम वतनी दिल्या; तसेच पुणे आणि वडगावचे वाडे, मंदिरे बांधण्यास पोतनीस यांच्या पूर्वजांना मदत केली, असा इतिहास आहे.

[संपादन] वाईजवळील निसर्गरम्य धोम

पुण्याहून वाई अवघे पाऊणशे किलोमीटर. वाई शहर, मेणवली, पांडवगड, पाचगणी अशी अनेक ठिकाणं वाईजवळ आहेत. वाईपासून धोम गावापर्यंत एसटी बससेवा तर आहेच; पण सहा आसनी रिक्षा आणि टॅक्‍सीही मिळू शकतात. ....... महाबळेश्‍वरला उगम पावलेल्या कृष्णा नदीवर बलकवडी आणि धोम ही दोन धरणे बांधली गेली; त्यामुळे वाईच्या कृष्णा नदीकिनारीच्या घाटांची रयाच गेली. धोम गावी आवर्जून जाऊन पाहावे असं एक मंदिर संकुल आहे. श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर आणि शेजारचे शिवमंदिर हा समूह भेट देण्याजोगा. इथं कृष्णेच्या तीरावर वाळुंज म्हणजे सॅलिक्‍स टेट्रास्पर्माची झाडी आहे. पूर्वी या वृक्षाच्या सालींपासून सॅलिसिलिक ऍसिड काढले जाई. त्याचा उपयोग डोकेदुखी थांबविण्यासाठी केला जाई. आता हे वेदनाशामक औषधी द्रव्य कृत्रिमरीत्या कारखान्यात तयार करतात.

[संपादन] सोलापूर

[संपादन] अक्कलकोट

अक्कलकोट स्वामी समर्थ भक्तांसाठी प्रसिध्द आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर, त्यांचा गावातील मठ प्रसिद्ध आहे. मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४/५ सहस्र भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिम आहे.अक्कलकोटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील आशियाखंडातील सर्वात मोठे(?) असलेले शस्त्रागृह. इथे सर्व जुने परंपरागत शस्त्रांचा साठा येथील भोसले राजगृहाने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. वेगवेगळे खड्ग, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुर्‍हाडी, बंदुका, खंजीर इत्यादी इत्यादींचे वैविध्याने नटलेले प्रदर्शन पाहून मन हरखून जाते.

येथील राजकन्येचा लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रह मनाला मोहवितो. राजपुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे मनाला भुरळ पाडतात. त्यानंतर शिवपुरीचे दर्शन मनाला वेगळीच दिशा देते. तेथे हवन, यज्ञ आणि सकाळ-सांयकाळी पौरोहित्याचे महत्त्व पटवण्यात येते.

अक्कलकोटमध्ये दोन मोठे भक्तनिवास आहेत. एक देवस्थानचा आणि एक अन्नछत्र मंडळाचा. सोयींच्या बाबतीत देवस्थानच्या भक्तनिवास थोडा उउवा आहे असे म्हणता येईल. तेथे तुमच्या गाडीच्या चालकासाठीसुद्धा सोय होते. छोटेसे उपाहारगृह, प्रशस्त खोल्या, स्वामींचे जीवनदर्शन घडवणारे छोटेसे कायमस्वरूपी संग्रहालय या गोष्टी आहेत.

[संपादन] ठाणे

[संपादन] वर्धा

महाराष्ट्रातील वर्ध्याजवळ सेवाग्रामचे महत्त्व काही वेगळेच आहे. महात्मा गांधींनी सेवाग्राम येथे दांडीयात्रेनंतर आपला मुक्काम जवळपास १० वर्षे होता.(१९३२ ते १९४२). देशाच्या मध्यभागी असलेले भौगोलिक स्थान, त्यामुळे देशातील सर्वच कार्यकर्त्यांना भेटणे सोईचे होईल हा त्यामागील उद्देश होता. येथे त्यांचा रम्य असा आश्रम आहे. बापूंची कुटी, बा की कुटी, त्यांचे सचिव महादेवभाई यांची कुटी, आश्रमातील रुग्णासाठी असलेली जागा, इतरत्र असलेली प्रशस्त जागा, मोठाले वृक्ष आणि रम्य असा परिसर एकदा तरी पहावा असाच आहे. जवळच पवनार येथे विनोबांनी स्थापन केलेला ब्रह्मविद्या आश्रम आहे. तेथील वैशिष्ट्य म्हणजे हा आश्रम पूर्णपणे स्त्रियाच चालवतात. स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांनी ब्रह्मविद्येचा अभ्यास करावा असे विनोबाजींचे मत होते. तेथे राहण्याचीसुद्धा सोय आहे. विनोबा आणि गांधीविचाराचे सर्व साहित्य येथे मिळते. गांधींनी आपले पाचवे मानलेले पुत्र श्री. जमनादासजी बजाज यांचे वस्तुसंग्रहालय पाहतांना स्वातंत्र्य चळवळीशी आपले नाते वेगळ्याच पातळीवर जाऊन ठेपते. मगनवाडी येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे निवासस्थान आहे. तेथे सरहद्द गांधी वगैरे नेते मुक्काम करीत असत. तेथे जुनी फोर्ड गाडी ठेवलेली आहे. तिला बैल जोडून त्यावेळच्या नेत्यांना नेण्याआणण्यासाठी वापरत. सरदार पटेल तिला थट्टेने ऑक्स-फोर्ड असे म्हणत. गीताई मंदिर. विनोबाजींची गीताई मोठ्या शिलाखंडावर कोरलेली आहे. त्याची रचनाही पाहण्यासारखी आहे. आकाशातून पाहिले तर त्या शिलाखंडाचा आकार चरख्याप्रमाणे अथवा बसलेल्या गायीप्रमाणे वाटतो. जवळच बुद्धाची एक मोठी बसलेल्या अवस्थेतील मूर्तीही दिसते. तेथे अनेक परकीय पर्यटक भेट देत असतात. एका दिवसाची सेवाग्राम भेट एक आगळे वेगळे समाधान देते.

[संपादन] वाशिम

[संपादन] यवतमाळ

[संपादन] बाह्यदुवे

महाराष्ट्र राज्य संदर्भ कोष मनोगतावरील संबंधित लेख भटकंती

Static Wikipedia March 2008 on valeriodistefano.com

aa   ab   af   ak   als   am   an   ang   ar   arc   as   ast   av   ay   az   ba   bar   bat_smg   bcl   be   be_x_old   bg   bh   bi   bm   bn   bo   bpy   br   bs   bug   bxr   ca   cbk_zam   cdo   ce   ceb   ch   cho   chr   chy   co   cr   crh   cs   csb   cv   cy   da   en   eo   es   et   eu   fa   ff   fi   fiu_vro   fj   fo   fr   frp   fur   fy   ga   gd   gl   glk   gn   got   gu   gv   ha   hak   haw   he   hi   ho   hr   hsb   ht   hu   hy   hz   ia   id   ie   ig   ii   ik   ilo   io   is   it   iu   ja   jbo   jv   ka   kab   kg   ki   kj   kk   kl   km   kn   ko   kr   ks   ksh   ku   kv   kw   ky   la   lad   lb   lbe   lg   li   lij   lmo   ln   lo   lt   lv   map_bms   mg   mh   mi   mk   ml   mn   mo   mr   ms   mt   mus   my   mzn   na   nah   nap   nds   nds_nl   ne   new   ng   nl   nn   nov  

Static Wikipedia (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2007 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2006 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu

Static Wikipedia February 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu