राजगड
Wikipedia कडून
राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
किल्ला | |
---|---|
नाव | राजगड |
उंची | १३९४मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | कर्जत, पाली |
डोंगररांग | पुणे |
सध्याची अवस्था |
किल्ले राजगड: हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड! शिवतिर्थ रायगड श्री. शिवछत्रपतींच्या कार्याचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
राजगड किल्ला साधारण २००० वर्षापूर्वीचा आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमपुत्र सातकर्णी याने दिले. सन १६४५ मध्ये शिवरायांनी किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व राजगड असे नामकरण केले. मराठेशाहीची २६ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकिय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.
पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर व भोरच्या वायव्येला २४ की.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खो-याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे.
मावळभागात राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड व तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते.
तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्याने राजकीय केंद्र म्हणुन हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड हा दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय, राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते.
एवढी सुरक्षितता होती म्हणुन राजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माची व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असुन समुद्रसपाटीपासुन त्याची उंची १३९४ मीटर आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.
[संपादन] गडाची माहिती
किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
- गुंजवणे गावातून चोरदरवाजा मार्गे
- पाली गावातून पाली दरवाजा मार्गे
- वाजेघर मार्गे.
पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेलं की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडं वर आलं की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरुज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला तुलनेने ही सोपी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे , एक ब्रम्हर्षी मंदिर आहे.
[संपादन] छायाचित्रे
[संपादन] गडावर जाण्याच्या वाटा
कर्जत, पाली बसस्थानकावरुन जाणा-या रा.प. मंडळाच्या गाड्या किंवा खाजगी वाहन.