अल्बर्ट आइनस्टाइन
Wikipedia कडून
अल्बर्ट आइनस्टाइन | |
![]() ओरेन जे. टर्नर याने काढलेले आइनस्टाइनचे छायाचित्र (१९४७) |
|
जन्म | मार्च १४, १८७९ उल्म, व्युर्टेंबर्ग, जर्मनी |
मृत्यू | एप्रिल १८, १९५५ प्रिन्स्टन, न्यू जर्सी, अमेरिका |
निवासस्थान | जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, अमेरिका |
नागरिकत्व | जर्मन (१८७९-९६, १९१४-३३) |
धर्म | ज्यू |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
कार्यसंस्था | त्स्युरिक विद्यापीठ चार्ल्स विद्यापीठ, प्राग प्रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस कायसर विल्हेल्म इन्स्टिट्यूट लायडन विद्यापीठ |
प्रशिक्षण | ईटीएच् त्स्युरिक |
ख्याती | सापेक्षतावाद |
पुरस्कार | ![]() कॉप्ली पदक (१९२५) माक्स प्लांक पदक (१९२९) |
आईन्स्टाइन जन्म मार्च १४ इ.स. १८७९, मृत्यू १८ एप्रिल इ.स. १९५५
आईन्स्टाइन हे एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतेचा सिद्धांत, (विशेष सिद्धांत, सामान्य सिद्धांत), प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धांतासाठी आणि "त्यांच्या सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी" इ.स. १९२१ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन "सन्मानित" केले गेले. आईन्स्टाइन यांना त्यांच्या सापेक्षतेच्या सिद्धांतानंतर जगभर अफाट प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध चेहर्यांपैकी एक बनले. "आईन्स्टान" या नावाचा अनेक ठिकाणी वापर (आणि/किंवा गैरवापर) होऊ लागला. त्या प्रकारांमुळे वैतागलेल्या आईन्स्टाइन यांनी "अल्बर्ट आईन्स्टाइन" ची व्यापारचिन्ह म्हणून नोंदणी केली. एका शास्त्रज्ञाला त्याची इतकी प्रसिद्धी असणे आणि त्यामुळे होणारे परिणाम याचा अनुभव नसावा. आज बुद्धिमत्ता आणि आईनस्टाइन हे एक प्रकारे समीकरणच बनले आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] चरित्र
[संपादन] बालपण
अल्बर्ट आईन्स्टाइन यांचा जन्म जर्मनी देशातील वुर्टेंबर्गमधील उल्म या गावामध्ये झाला, उल्म स्टुटगार्टपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यांचे वडील हर्मन आईन्स्टाइन हे व्यवसायाने विक्रेता होते आणि त्यांनी नंतर विद्युत-रासायनिक पदार्थांशी निगडित कारखाना काढला. अल्बर्टच्या आईचे नाव पौलिन होते आणि त्या गृहिणी होत्या. ते एक ज्यू कुटुंब होते. अल्बर्ट तेथील एक कॅथॉलिक प्राथमिक शाळेत शिकले आणि त्यांच्या आईच्या आग्रहामुळे त्यांनी व्हायोलिन या तंतुवाद्याचे काही धडे घेतले.
पाच वर्षे वयाचा असताना अल्बर्टला त्यांच्या वडिलांकडून एक होकायंत्र भेट मिळाले आणि त्या होकायंत्राच्या सुईवर "रिकाम्या जागेतील काहीतरी गोष्टीचा" प्रभाव पडत आहे ही गोष्ट त्यांना उमगली. नंतरच्या आयुष्यात, अल्बर्ट त्या अनुभवाचा उल्लेख त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या अनुभूतींमधील एक असे सांगत.
[संपादन] शाळेतील दिवस
अल्बर्ट यांना शाळेतील दिवसात धीम्या गतीने शिकणारा समजण्यात येत असे. कदाचित या मागील कारण आरोग्यविषयक बाबींशी निगडित असावे. परंतु सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे काही श्रेय त्यांनी त्यांच्या धीम्या गतीने शिकण्याला दिले, कारण इतरांच्या तुलनेत काळ आणि अवकाश हे उशिराने शिकल्यामुळे ते एकप्रकारे प्रगत पद्धतीने विचार करू शकले.
[संपादन] दंतकथा
अल्बर्टच्या धीम्या गतीने शिकण्याला एक दंतकथा जोडली गेली. अल्बर्ट हे गणित विषयात कच्चे होते आणि त्या विषयात वारंवार नापास झाल्याने त्यांच्या शिक्षकाने त्यांना त्या कारणास्तव शाळेबाहेर काढले (आणि वगैरे). पुढे जेव्हा सापेक्षतावादाच्या सिद्धांतानंतर त्या शिक्षकांनी त्यांचे प्रामाणिक मत व्यक्त केले की "अल्बर्टसारखा मुलगा असा शोध लावेल हे तेव्हा स्वप्नातही वाटले नाही आणि आताही ते खरे वाटत नाही". परंतु त्या मागील खरे कारण असे आहे की त्या वर्षी श्रेणीबदलाच्या नव्या नियमांमुळे थोडा गोंधळ उडाला होता. त्य्यामुळे या दंतकथेला सुरुवात झाली असावी.
[संपादन] महाविद्यालयातील दिवस
[संपादन] संशोधन आणि डॉक्टरेट
[संपादन] प्रकाशीय विद्युत परिणाम
[संपादन] ब्राऊनीची गती
[संपादन] सापेक्षतेचा विशेष सिद्धांत
[संपादन] वस्तुमान आणि ऊर्जा समानता
[संपादन] मधल्या काळातील वर्षे
[संपादन] सापेक्षतेचा सामान्य सिद्धांत
[संपादन] कोपेनहेगनचे अर्थबोधन
[संपादन] बोस-आईन्स्टाइन सांख्यिकी
[संपादन] उत्तरकाळातील वर्षे
[संपादन] इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडी (प्रगत अभ्यासाची संस्था)
[संपादन] सामान्यीकरणाचा सिद्धांत
[संपादन] व्यक्तिमत्त्व
[संपादन] धार्मिक विचार
[संपादन] राजकीय विचार
[संपादन] प्रसिद्धी आणि सांस्कृतिक आघात
[संपादन] मनोरंजन
[संपादन] अनुज्ञप्तीकरण
[संपादन] सन्मान
[संपादन] संदर्भ
[संपादन] हे देखील पहा
[संपादन] बाह्यदुवे
ru-sib:Ейнштейнов, Альбер